Home Breaking News • पोलिस दलातील जवानांच्या कर्तव्याचा गौरव ! • लोकशाही उत्सवात जबाबदारी...

• पोलिस दलातील जवानांच्या कर्तव्याचा गौरव ! • लोकशाही उत्सवात जबाबदारी पार पाडली पोलिसांनी!

54

• पोलिस दलातील जवानांच्या कर्तव्याचा गौरव !

• लोकशाही उत्सवात जबाबदारी पार पाडली पोलिसांनी!

गडचिरोली -किरण घाटे

लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणूक दरम्यान अंदाजे २० दिवस पोलिस कर्मचारी बांधव दिवस रात्र डोळ्यात तेल टाकून आपल्या कर्तव्यावर तैनात होते विशेषतः मतदानानंतर स्ट्राॅंग रूमच्या सुरक्षेसाठी त्यांनी थंडीची तमा न बाळगता सदैव खड़ा पहारा दिला.
आपल्या हाताखालील कर्मचा-यांनी केलेल्या या चोख बंदोबस्ताची दखल घेत गडचिरोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक विनोद चव्हाण यांनी त्याची दखल घेत त्यांनी कार्यतत्पर पोलिस कर्मचा-यांचा पुष्पागुच्छ देत सत्कार केला.त्यांचा हा उपक्रम पोलिस दलातील पोलिसांचे मनोबल वाढविणारा आहे.अनेकानी या अभिनव उपक्रमाचे स्वागत केले आहे.एखाद्या वरिष्ठ अधिका-याने केलेला सन्मान म्हणजे त्यांच्या कामाची खरी पावती आहे.
या सत्कारामुळे पोलिस कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.