
#Chandrapur
•चंद्रपूर मनपा सार्वत्रिक निवडणूक!
• आपच्या पहिल्या यादीतील उमेदवार जाहीर!
• यादीत दहा उमेदवारांचा प्रामुख्याने समावेश
चंद्रपूर : किरण घाटे
चंद्रपूर : येत्या 16 जानेवारीला चंद्रपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होवून घातली असून शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत आपल्या उमेदवारांना निवडणूक मैदानात उतरविण्याचे ठरविले आहे.
त्या दृष्टीकोनातून त्यांच्या हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत.
दरम्यान आम आदमी पक्षाने देखील आपल्या पक्षामार्फत निवडणूक रिंगणात उतरणा-या उमेदवारांची सर्वप्रथम पहिली यादी जाहीर केली आहे.
या यादीत विविध प्रभागातील 10 उमेदवारांचा समावेश असल्याचे एकंदरीत दिसून आले.
सध्यास्थितीत आपचे कार्य उल्लेखनीय असून याच पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील अनेक प्रश्नांबाबत आपला आवाज उठवून ख-या अर्थाने जनतेला न्याय मिळवून दिला आहे.हे तेवढेच सत्य आहे.
