
• नागरिकांना दाखले मिळण्यास मुल नगर परिषद मध्ये होतोय विलंब!
• दत्तात्रय समर्थंची चंद्रपूरचे
जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कडे लेखी तक्रार दाखल!
चंद्रपूर -किरण घाटे
शासकीय कार्यालयात नागरिकांची आवश्यक कामे जलद गतीने पार पडावी हे शासनाचे धोरण असले तरी काही कार्यालयात मात्र आजही क्षुल्लक कामासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र प्रत्यक्ष बघावयास मिळत आहे.
मुल नगर परिषद मध्ये नागरिकांना आवश्यक कामासाठी वेळेवर दाखले मिळत नाही अशी स्थानिक जनतेची तक्रार असून आज याच संदर्भात भारतीय जनहित कार्यसेवाचे चंद्रपूर गडचिरोलीचे अध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे एक लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे.
⬜◾⬜आठ दिवसांपासून येथील नागरिक नगर परिषदेच्या कार्यालयात दाखले मिळण्यासाठी सतत येत आहेत .परंतु त्यांना ते दाखले वेळेवर मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे.
◾⬜◾जनतेला आवश्यक कामासाठी दाखले मिळण्याची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दत्तात्रय समर्थ यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या एका लेखी निवेदनातून केली आहे.
