Home Breaking News #Chandrapur • मीनाक्षी गुजरकर चंद्रपूर मनपा निवडणूक रिंगणात उतरणार

#Chandrapur • मीनाक्षी गुजरकर चंद्रपूर मनपा निवडणूक रिंगणात उतरणार

127
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

#Chandrapur
• मीनाक्षी गुजरकर चंद्रपूर मनपा निवडणूक रिंगणात उतरणार

सुवर्ण भारत:किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)

सामाजिक व राजकीय क्षेत्रात सदैव सक्रिय व अग्रणी भूमिका बजावणाऱ्या चंद्रपूर शहरातील जटपुरा वार्डाच्या मूळ रहिवासी मीनाक्षी संजय गुजरकर यांनी आगामी चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली आहे. त्या काँग्रेस पक्षाच्या वतीने जटपुरा प्रभाग क्रमांक ७ मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी आज प्रतिनिधीशी बोलताना दिली.

मीनाक्षी गुजरकर या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रीय असून महिला सशक्तीकरण, युवकांचे प्रश्न, आरोग्य, शिक्षण तसेच नागरी मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत स्थानिक नागरिकांमध्ये त्यांना व्यापक पाठिंबा लाभत असल्याचे चित्र आहे.

चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक कारभार व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. पक्षश्रेष्ठी व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या उमेदवारीमुळे जटपुरा प्रभागातील राजकीय वातावरणात चांगलीच हालचाल निर्माण झाली असून येत्या काळात ही लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.