Home Breaking News पीएचडी पदवीने प्रा.स्वप्नील बोबडे सन्मानित

पीएचडी पदवीने प्रा.स्वप्नील बोबडे सन्मानित

59
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

पीएचडी पदवीने प्रा.स्वप्नील बोबडे सन्मानित

राजुरा (चंद्रपूर) – किरण घाटे

राजु-यातील स्थानिक टीचर्स कॉलनी विवेकानंद नगर येथील मुळ रहिवाशी प्रा.स्वप्नील श्रीराम बोबडे यांनी जिद्द, चिकाटी,आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएचडी पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली.

प्रा. बोबडे यांनी आपला शोध प्रबंध राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात “चंद्रपूर जिल्हातील कृषी उत्पादन, उत्पादकता व पीक रचनेचे अध्ययन” या विषयावर सादर केला होता. त्यांच्या या महत्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. समित माहोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मौखिक परीक्षेसाठी पुणे येथील तज्ज्ञ प्रा. डॉ. शिवाजी ढगे यांनी बहिस्थ परीक्षक म्हणून काम पाहिले. या परीक्षेअंती विद्यापीठाने त्यांना पीएचडी पदवी बहाल केली. त्यांच्या या संशोधनाचा उपयोग चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रा.स्वप्निल बोबडे सध्या बल्लारपूर येथील महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग प्रमुख, सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यांना पीएचडी पदवी प्रदान केल्याबद्दल महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर, उपाध्यक्ष राजु चिताडे, प्राचार्य डॉ.रजत मंडल आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.