
मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानात समावेश असणा-या ग्रामपंचायत मधील महिला बचत गटाला बँक कर्ज वितरीत
सावली (चंद्रपूर )-किरण घाटे
सावली तालुक्यात महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री समृद्धी
पंचायतराज अभियान अंतर्गत एकूण 10 ग्रामपंचायतीचा समावेश केलेला आहे. या गावांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध विभागाचे काम समाविष्ठ केलेले आहे. जेणेकरून गावाचा विकास होईल,या अभियानात महिलांचा सर्वांगीग विकास करणे हा महत्वाचा मुद्दा असून त्याच अनुषंगाने महिलांच्या बचत गटांना बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तालुक्यात गट विकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे काम सुरु आहे. या अभियान अंतर्गत स्थापन झालेल्या समूहाला बँकेकडून कर्ज वितरीत केले जाते. याच धर्तीवर महिलांच्या सर्वांगीग विकासाकरीता दि .23डिसेंबरला केशरवाही येथील रेणुका महिला बचत गटाला महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून 300000 रुपये कर्ज वितरीत करण्यात आले. या प्रसंगी मुक्तेस्वर कोमलवार यांनी जास्तीत जास्त कर्ज घेऊन स्वतःची उपजीविका निर्माण करावी व लखपती दीदी कडे वाटचाल करावी असे आवाहन केले.बँकेची शाखा व्यवस्थापक कु. प्राची बोडाळे विवेक नांगरे(BMM), पंकज गोटपर्तीवार, विवेक बुरले,पल्लवी गावतुरे उपस्थित होते. बचत गटातील महिलांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कामकाजा बाबत समाधान व्यक्त केले.आतापर्यंत तालुक्यातील मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानात समाविष्ठ गावातील बचत गटांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन स्वतःची उपजीविका निर्माण करत आहेत. भविष्यात महिलांच्या सर्वांगीग विकासाकरिता बचत गट महत्वाचे ठरणार आहे.


