पत्रकार दिन समारंभाचे आयोजन पत्रकारांच्या कार्याचा होणार सन्मान
राजुरा (चंद्रपूर) : किरण घाटे

राजुरा तालुका पत्रकार संघ आणि राजुरा पत्रकार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन सोहळा दि. ६ जानेवारी २०२६, मंगळवार रोजी सायंकाळी ६ वाजता शिवाजी संकुल (सुपर मार्केट हॉल), राजुरा येथे आयोजित करण्यात आला आहे. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी आणि मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण च्या प्रकाशन दिनानिमित्त हा सोहळा होत असून, पत्रकारितेच्या सामाजिक योगदानाला यावेळी गौरवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार देवराव भोंगळे भूषविणार असून उद्घाटन माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार ॲड. संजय धोटे, नगरपरिषद अध्यक्ष अरूण धोटे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, चंद्रपूर जिल्हा व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष अनिल बाळसराफ, चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष डॉ. उमाकांत घोटे, राजुरा पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्णा गोरे आदिं मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पत्रकारिता, सामाजिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. यात हैदर शेख (न्यूज १८ लोकमत चॅनल), नंदकिशोर वाढई (आदर्श सरपंच, ग्रामपंचायत कळमना), संदिप रायपूरे (दै. ॲग्रोवन), राजकुमार डाखरे ( एलआयसी, हाऊसिंग फायनान्स विदर्भ टॉपर), अविनाश दोरखंडे (प्रेस फोटोग्राफर) आणि प्रकाश काळे (दै. लोकमत पत्रकार) यांचा समावेश आहे.
२०२६ सालचे स्मृती पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये स्व. महियार गुंडेविया स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार अनिल बाळसराफ, स्व. प्रभाकरराव मामुलकर स्मृती उत्कृष्ट वार्तांकन पुरस्कार (अभिजीत भुते तर्फे) धनराजसिंह शेखावत (तालुका प्रतिनिधी, दै. लोकमत समाचार, कोरपना), स्व. राघवेंद्रराव देशकर स्मृती ग्रामीण वार्ता पुरस्कार (मिलिंद देशकर तर्फे) सुग्रीव गोतावळे (तालुका प्रतिनिधी, दैनिक सकाळ, जिवती), स्व. सुरेंद्र डोहे स्मृती प्राविण्य पुरस्कार (राजेंद्र डोहे तर्फे) गजेंद्र दवस (प्रतिनिधी, दै. लोकमत, विरूर स्टेशन), स्व. शंकरराव देशमुख स्मृती इलेक्ट्रॉनिक्स मीडिया वार्तांकन पुरस्कार (विनायक देशमुख तर्फे) हबीब शेख (तालुका प्रतिनिधी, सी. टीव्ही, कोरपना), स्व. सरस्वतीवाई बोर्डवार स्मृती महिला सामाजिक कार्यकर्त्या पुरस्कार ( शुभम बोर्डेवार तर्फे) कु. यीशिता काळे (सामाजिक कार्यकर्त्या, राजुरा) आदि मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजुरा तालुका पत्रकार संघ व राजुरा पत्रकार असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत.
या प्रेरणादायी सोहळ्यास नागरिकांनी, पत्रकारांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.


