Home Breaking News बोरगाव धांडे येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळा थाटात संपन्न! कार्यक्रमाला...

बोरगाव धांडे येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळा थाटात संपन्न! कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती

63

#Bhadravti

• बोरगाव धांडे येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळा थाटात संपन्न!

• कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती

तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर

भद्रावती : तालुक्यातील बोरगाव धांडे येथे दिनांक 6 व 7 जानेवारीला लोडबाजी भोयर यांच्या निवासस्थान परिसरातील प्रांगणात वंदनिय विश्वसंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 57 वा पुण्यतिथी सोहळा थाटात पार पडला.
या निमित्ताने गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तद्वतच काही प्रतिष्ठित मंडळींचा श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सत्कार पार पडला.
रामकृष्णजी गाडगे यांचे किर्तन यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बाळासाहेब पडवे यांनी भक्तांना या वेळी मार्गदर्शन केले.
बुधवारला दुपारी महाप्रसाद होवून या दोन दिवसीय कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.