Home Breaking News वरोरा न.प. उपाध्यक्षपदी योगिता नेरकर यांची निवड सुवर्ण भारत : खेमचंद नेरकर...

वरोरा न.प. उपाध्यक्षपदी योगिता नेरकर यांची निवड सुवर्ण भारत : खेमचंद नेरकर तालुका प्रतिनिधी, वरोरा

46

वरोरा न.प. उपाध्यक्षपदी योगिता नेरकर यांची निवड

सुवर्ण भारत : खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या अर्चना ठाकरे या नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या योगिता नेरकर यांची वरोरा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार प्रवीण चिमूरकर यांचा एका मताने पराभव केला.

उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसप्रणीत शहर विकास आघाडीकडून योगिता नेरकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. भाजपकडून प्रवीण चिमूरकर व नुपूर तेला यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, नुपूर तेला यांनी माघार घेतल्याने थेट लढत नेरकर व चिमूरकर यांच्यात झाली. या निवडणुकीत योगिता नेरकर यांना १४ मते, तर प्रवीण चिमूरकर यांना १३ मते मिळाली.

दरम्यान, स्वीकृत नगरसेवक म्हणून काँग्रेसचे विलास टिपले, अ‍ॅड. प्रदीप बुरान तसेच भाजपचे शंभूनाथ वरघणे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच मनीष जेठानी व गजानन जिवतोडे यांना सभापतिपद मिळण्याची चर्चा नगरपरिषद वर्तुळात सुरू आहे.

ही निवड प्रक्रिया मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्या उपस्थितीत पार पडली. नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.