Home Breaking News एकाच टी.पी.वर दोन ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक; पोलिसांनी ट्रॉक्टर चालान केल्यावरही...

एकाच टी.पी.वर दोन ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक; पोलिसांनी ट्रॉक्टर चालान केल्यावरही पोलीस सोडून कसे काय देतात गंभीर आरोप

143

• एकाच टी.पी.वर दोन ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक;

पोलिसांनी ट्रॉक्टर चालान केल्यावरही पोलीस सोडून कसे काय देतात गंभीर आरोप

चंद्रपूर प्रतिनिधी : राजेश येसेकर

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील विरूर पोलिस स्टेशन हद्दीत वरूर ते विरूर या सुमारे १० किलोमीटर अंतराच्या मार्गावर एकाच ट्रान्झिट पास (टी.पी.) वर दोन ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे अवघ्या एका तासाच्या अंतराच्या मार्गासाठी चार तासांची टाइमिंग टी.पी.वर नमूद करण्यात आल्याने रेती तस्करांना गैरफायदा मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
सदर ट्रॅक्टर चालकांकडे ना वैध परवाना, ना बॅच नंबर असून दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी विरूर पोलिसांनी चलान कारवाई केली असली, तरी पोलिस स्टेशनमध्ये ट्रॅक्टर लावूनही नंतर ते कसे सोडण्यात आले, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
घटनेच्या वेळी मंडळ अधिकारी सुभाष साळवे हेही घटनास्थळी उपस्थित होते. यासंदर्भात तहसीलदारांशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी स्पष्टपणे “एका टी.पी.वर एकाच वाहनाची वाहतूक करता येते” असे सांगितले. तरीही प्रत्यक्षात दोन ट्रॅक्टर एकाच टी.पी.वर चालत असल्याने संबंधित टी.पी. देणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
टी.पी.च्या नावाखाली रेतीची अवैध तस्करी सुरू असून प्रशासनाकडून हातमिळवणी होत आहे का, अशी चर्चा गावात रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.