Home Breaking News मनपा निवडणूकीसाठी अंदाजे 55ते 60 टक्के मतदान ⬛उमेदवारांचे भाग्य मशीन मध्ये सिलबंद...

मनपा निवडणूकीसाठी अंदाजे 55ते 60 टक्के मतदान ⬛उमेदवारांचे भाग्य मशीन मध्ये सिलबंद ! ⬛आज मतमोजणी

53

• मनपा निवडणूकीसाठी अंदाजे 55ते 60 टक्के मतदान
• उमेदवारांचे भाग्य मशीन मध्ये सिलबंद !
• आज मतमोजणी

चंद्रपूर -किरण घाटे

तब्बल साडेतीन वर्षांनंतर गुरुवारी चंद्रपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली.
या निवडणुकीसाठी
चारशे एक्कावन उमेदवार आपले नशीब आजमविण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
दरम्यान सकाळी मतदान केंद्रावरती मतदारांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.दुपारी चार नंतर शहरातील बहुतेक सर्वच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वेगाने वाढल्याचे दिसून आले.
काही मतदार केन्द्रावर मतदारांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.तेथील केंद्रावर लांब रांगा असल्यामुळे मतदान प्रक्रिया ही रात्री उशिरापर्यंत चालल्याचे वृत्त आहे.
महाकाली मंदिर परिसरातील एका मतदान केंद्रावर मतदान मशिन ब़ंद पडल्यामुळे मतदानास विलंब झाल्याचे काहींचे म्हणणे आहे.
एका महिला अपक्ष उमेदवाराच्या पतीस मारहाण झाल्याची घटना काल घडली असल्याचे समजते.
पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या बळाचा वापर करावा लागल्याचे वृत्त आहे.
⬛पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता.काही किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले.
आज शुक्रवारला सकाळी दहा वाजता मतमोजणी होत आहे.