• कोर्ला गावातील आग दुर्घटना ग्रस्त तोगर कुटुंबाला
• माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या कडून आर्थिक मदत.!
सुवर्ण भारत : शंकर महाकाली

सिरोंचा:- तालुक्यातील कोर्ला येथील लक्ष्मीबाई मलय्या तोगर यांच्या कुटुंबावर भीषण आग दुर्घटनेमुळे मोठे संकट ओढवले.या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून आधारकार्ड, जन्म दाखले,जात प्रमाणपत्र,टी.सी.तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रेही आगीत नष्ट झाली.सुदैवाने रेशनकार्ड स्वस्त धान्य दुकानात असल्यामुळे ते सुरक्षित राहिले.
लक्ष्मीबाई तोगर या विधवा असून त्यांच्या पतीचे सुमारे वीस वर्षांपूर्वी निधन झाले आहे.त्यांनी मोलमजुरी करून आपल्या चार मुलांचा सांभाळ करत त्यांना मोठे केले. त्यांच्या मुलांमध्ये विनोद मलय्या तोगर, शिवराम तोगर, सत्यम तोगर आणि संजय तोगर यांचा समावेश आहे.यापैकी विनोद शिवराम व सत्यम यांचे विवाह झाले असून संजय अविवाहित आहे.
या दुःखद घटनेची माहिती मिळताच अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी तोगर कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिला.आणि तोगर कुटूंबाला आर्थिक मदत केली.
यावेळी कोर्ला गावाचे भाजपा बुथ प्रमुख बस्वय्या दुर्गम,प्रभारी गोपाल सडमेक, गजानन कलाक्षपवार,धनंजय पागे,भारत कलाक्षपवार तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
या मदती बद्दल तोगर कुटुंबीयांनी व कोर्ला ग्रामस्थांनी राजे साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.!
