#Bramhpuri
• ट्रॅक्टर दरीत कोसळला- दोघांचा मृत्यू !
• ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना पोलिस घटनास्थळी दाखल
ब्रम्हपुरी( चंद्रपूर): किरण घाटे

चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील गोगांव–सायगाव मार्गावर काल गुरुवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात झाला.
चालकाचे नियंत्रण सुटलेला ट्रॅक्टर रस्त्यालगतच्या दरीत कोसळल्याने प्रवीण भोयर आणि शिवाजी दोडके यांचा जागीच मृत्यू झाला तर याच अपघातात अन्य काही जण किरकोळ जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,असे कळते कि गोगांव–सायगाव रोडवरून ट्रॅक्टर जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी ट्रॅक्टर थेट दरीत कोसळले.
अपघात इतका मोठा होता की दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघात घटना कानावर येताच ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन व मेंडकी पोलिस चौकीचे पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला व जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.
सदरहू घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या बाबतीत पोलिस अधिक चौकशी करीत आहे.
