#Varora
• वरोऱ्याचे व्हॉलीबॉल खेळाडू महाराष्ट्र राज्य संघात
वरोरा : दि १८ जाने लोकशिक्षण संस्था, वरोडा व वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा( WSF) च्या विविध खेळाडूंची निवड महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघात झाली आहे . वाराणसी उत्तर प्रदेश येथे संपन्न झालेल्या वरिष्ठ गट राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता पुरुष गटात शाश्वत शंकर धारणकर तर महिला गटात राशी दिनेशचंद्र मांडवकर यांची निवड झाली. तब्बल २५ वर्षानंतर महिला गटात वरोऱ्यातून राशीची वरिष्ठ गट महाराष्ट्र संघट निवड झाली हे विशेष.
लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूलची खेळाडू समृद्धी मनोज पिंगे हिची कडप्पा आंध्र प्रदेश येथे झालेल्या १४ वर्षाखालील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली. लोकमान्य कन्या विद्यालयाची खेळाडू उर्वी रवींद्र दसरे हिची बरेली उत्तर प्रदेश येथे झालेल्या वर्षाखालील राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली. गादरवारा मध्य प्रदेश येथे संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडू सृष्टी मोहन चाटे व आयुषी संजय कुबडे यांची मुलींच्या गटात तर मुलांच्या गटात वेदांत दीपक गोरकार याची महाराष्ट्र संघात निवड झाली.
निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील, कार्यवाह प्रा. विश्वनाथ जोशी, ऍड. दुष्यंत देशपांडे, वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन चे अध्यक्ष गजानन जीवतोडे यांनी केले.निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे वरोरा शहरात कौतुक होत असून खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील बांगडे, प्राचार्य राहुल राखे, मुख्याध्यापक संजय आंबुलकर ,मुख्याध्यापिका स्मिता धोपटे, अनिल घुबडे,गणेश मुसळे, दुष्यत लांडगे,ईश्वर डाबेराव,देवानंद डुकरे तथा तालुका क्रीडा अधिकारी निखिल बोबडे व वरिष्ठ खेळाडू यांना दिले आहे.



