Home Breaking News #Chandrapur • धावपळीच्या जीवनात अंगणवाडी ताईंनी घेतला मोकळा श्वास

#Chandrapur • धावपळीच्या जीवनात अंगणवाडी ताईंनी घेतला मोकळा श्वास

67

#Chandrapur
• धावपळीच्या जीवनात अंगणवाडी ताईंनी घेतला मोकळा श्वास

#चंद्रपूर : प्रियंका गायकवाड

सतत अंगणवाडीच्या कामात गुरफटून

सणाऱ्या बाबूपेठ विभागातील सर्व अंगणवाडी सेविकांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी मोकळा श्वास घेण्याचे ठरवले आणि त्या कमल पुष्प येथे फिरायला गेल्या. तिथे गेल्यानंतर घरच्या कामाचा व शाळेची जबाबदारी विसरून अगदी स्विमिंग टॅंक मध्ये खूप रमून गेल्या.
त्यांनी टिपटिप बरसा पानी या गाण्यावर खूप सुंदर नृत्य केले. अगदी स्वच्छंदपणे सुट्टीचा आनंद घेतला काहींनी लगोरी खेळली तर काहीजण क्रिकेट खेळल्या काही जणी झाडावर चढल्या. मनावरचा सर्व बोज बाजूला ठेवून अगदी मनमोकळेपणाने स्वच्छंदपणे दिवस घालवला. त्यावेळी या सर्व दिवसभरच्या कार्यक्रमाचे छायाचित्र टिपणाऱ्या समाजसेविका सारिका उराडे उपस्थित होत्या. या आजच्या सुंदर प्रवासाचे आयोजन करणाऱ्या विनोदा गेडाम व सुसज्ज असं व्यवस्थापन करणाऱ्या प्रियंका बनकर होत्या शिवाय सोबतीला सर्वांना सांभाळून घेणाऱ्या मुख्य सेविकाताई उपस्थित होत्या. आजचा हा दिवस मनोरंजक बनवण्यासाठी संघमित्रा खोब्रागडे, सुकविलाशी पडवेकर, पंचशीला ताकसांडे, सुनिता पिपरीकर, अनिता खनके, वंदना इतळवार, सुमन डेकाटे, शीला गावंडे, गीता बानकर विद्या गेडाम, वर्षा खोब्रागडे यांनी आपला प्रामुख्याने सहभाग नोंदविला.