Home Breaking News • मुल नगरपालिकेची सभापती व उपसभापतीची निवडणूक! • समर्थ,रत्नावार ,कागदेलवार, फूलझेले,आडपवार यांची...

• मुल नगरपालिकेची सभापती व उपसभापतीची निवडणूक! • समर्थ,रत्नावार ,कागदेलवार, फूलझेले,आडपवार यांची सभापती म्हणून निवड तर कडस्कर यांची उपसभापती म्हणून अविरोध निवड!

199

• मुल नगरपालिकेची सभापती व उपसभापतीची निवडणूक!
• समर्थ,रत्नावार ,कागदेलवार, फूलझेले,आडपवार यांची सभापती म्हणून निवड तर कडस्कर यांची उपसभापती म्हणून अविरोध निवड!

मुल (चंद्रपूर):किरण घाटे 

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल नगर पालिकेची निवड

णूक 2 डिसेंबरला पार पडली होती.
या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या.
काॅंग्रेस पक्षाचे 18 उमेदवार निवडून आले होते तर भाजपला अवघ्या दोन जागेवर समाधान मानावे लागले.
विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदासाठी एकता प्रशांत समर्थ या बहुमताने विजयी झाल्या होत्या.
आज मंगळवार दि.20 जानेवारीला सभापती पदाची निवडणूक झाली.त्यात प्रामुख्याने काँग्रेसचे प्रशांत समर्थ(बांधकाम सभापती) राकेश रत्नावार( आरोग्य सभापती) विलास कागदेलवार( पाणी पुरवठा सभापती)ललिता फूलझेले(शिक्षण सभापती) नलिनी आडपवार (महिला व बालकल्याण सभापती)यांची सभापती म्हणून अविरोध निवड झाली तर समिक्षा कडस्कर यांची
(शिक्षण उपसभापती) म्हणून अविरोध निवड झाली.या निवडणुकीचे कामकाज पिठासिन अधिकारी म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदिप दोडे यांनी बघितले.
गेल्या दहा वर्षांपासून या नगरपालिकेवर भाजपची सत्ता होती.
त्यानंतर साडे चार वर्ष प्रशासकराज होते. दि.2 डिसेंबरला पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला.या पक्षाचे 18 उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले.ही निवडणूक ह्या उमेदवारांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती.सदरहु
उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर,आमदार विजय वडेट्टीवार, या शिवाय काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले होते.
आज सभापती व उपसभापतीसाठी अविरोध निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे काँग्रेसचे नेते दत्तात्रय समर्थ यांनी अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.