Home Breaking News • आशांचे मानसिक छळ करणे बंद करा-अरुण भेलके • चंद्रपूरात...

• आशांचे मानसिक छळ करणे बंद करा-अरुण भेलके • चंद्रपूरात विशाल धरणे !

73

• आशांचे मानसिक छळ करणे बंद करा-अरुण भेलके

चंद्रपूरात विशाल धरणे !

चंद्रपूर: किरण घाटे

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा वर्कर आणि गटप्रवर्तक ज्या कमिटमेंटनी सेवा देत आहेत. त्या आधारावर त्यांना देशात आरोग्याचा कणा म्हटल्या जाते. करोणा काळातील सेवेबद्दल डब्ल्यू .एच .ओ ने त्यांना विश्व आरोग्य नेते म्हटले. तर चित्रपट कलेने त्यांची दखल घेत त्यांच्यावर आशा नावाचं चित्रपट काढलं. एकीकडे आशांच्या कामाचं कौतुक व गौरव होत असताना, दुसरीकडे मात्र त्यांच्यावर कामाचा ताण प्रचंड वाढत आहे. केलेल्या कामाचं दाम वेळेवर मिळत नाही . यामुळे त्यांच्यावर मानसिक तणाव वाढत आहे. त्यांच्यात प्रचंड असंतोष वाढत आहे. आशांचे मानसिक छळ करणे थांबवून शासनाने आशांच्याही आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांना आर्थिक सुरक्षा द्यावी. त्यांना कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. असे मत आशा संघटनेचे जिल्हा सचिव कॉ. अरुण भेलके यांनी व्यक्त केले.
ते आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटना (लाल बावटा) सीआयटीयूच्या नेतृत्वात अशांच्या प्रश्नांना घेऊन दि.20 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या धरणा आंदोलन कार्यक्रमात संबोधित करताना बोलत होते.
याप्रसंगी कॉ. किशोर जामदार, कॉ. राजेश पिंजरकर, सायली बावणे, संघटनेच्या अध्यक्ष, सुलभा पाटील, कषाध्यक्ष, नंदा मडावी, श्रद्धा पाचभाई, आदींनी सभेला मार्गदर्शन केले.
केंद्र व राज्याचा मोबदला एकत्रित दर महिन्याच्या पाच तारखेला देण्यात यावे.
केंद्राचा व राज्याचा थकीत मोबदला त्वरित देण्यात यावे.
ऑनलाइन काम मात्र ॲपवरील कामासाठी ट्रेनिंग, 5G मोबाईल, सिम कार्ड, रिचार्ज व योग्य मोबदला देण्यात यावा.
करोना काळातील धोकादायक कामाचा प्रोत्साहन भत्ता त्वरित देण्यात यावा.
आरोग्यवर्धिनी, पी एम एम व्ही वाय, कुष्ठरोग सर्वे, एनसीडी, हत्तीपाय प्रतिबंधक गोड्या वाटप सारख्या केलेल्या कामाचा थकीत मोबदला त्वरित द्यावा.
संस्थात्मक प्रसुती लाभार्थीचा मोबदल्यात एपीएल व बीपीएलचे फरक रद्द करून दोन्हीचा मोबदला द्यावा.
डिलिव्हरी होत पर्यंत दवाखान्यात थांबण्याची आशांना सक्ती करू नये. सिकलसेल सर्वे, ऑनलाइन काम करणे चा मोबदला देण्यात यावा.
आशांना अतिरिक्त कामाची सक्ती करू नये. वरील मागण्यांचे
शिष्टमंडळाद्वारे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सादर करण्यात आले. या शिष्ट मंडळात वंदना बडवाईक, अर्चना गिरसावळे, सीमा वनकर, रेहाना शेख, नंदा मळावी, रफिका कुरेशी, सुवर्णा नीमकर, उषा येनुरकर, शोभा कुरेकर, शोभाताई आत्राम, प्रियंका काकडे, वैशाली मोडक आदीं सहभागी झाले होते. धरणा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता, पुनम सरोदे, माधुरी बोलीवार, कुसुम प्रधाने, माधुरी मते, संगीता डोरलीकर, अल्पिता जवादे, सुरेखा वाघमारे, अभंगा चहांदे, गीता रामटेके, वनमाला भगत यांनी अथक परिश्रम घेतले.