Home Breaking News माजी विद्यार्थी व माजी शिक्षक स्नेह मीलन सन्मान सोहळा आयोजित.

माजी विद्यार्थी व माजी शिक्षक स्नेह मीलन सन्मान सोहळा आयोजित.

54

माजी विद्यार्थी व माजी शिक्षक स्नेह मीलन सन्मान सोहळा आयोजित.

प्रतिनिधी : राजेश येसेकर

भद्रावती : यवतमाळ जिल्ह्यातील तालुका वणी येथील पंचशील हायस्कुल नांदेपरा येथील ८६-८७ वर्षामधील वर्ग दहाचे म्हणजे ३९ वर्षानंतरच्या माजी विद्यार्थी व शिक्षक यांच्या जुन्या आठवणींना उजाला देण्यासाठी वर्ग १० चे माजी विद्यार्थी व माजी शिक्षकांचा सन्मान सोहळा करण्यासाठी स्नेह मीलन व माजी शिक्षक सन्मान सोहळा दि.२१जानेवारी २०२६ रोज बुधवार ला सकाळी १० वाजता आयोजित केला आहे.

माजी विद्यार्थी व शिक्षक यांच्या मधील भुतकाळात हरवलेल्या आठवणी समृद्ध करण्यासाठी आपल्या वर्ग १० वा १९ ८६ व ८७ बँच च्या सर्व माजी विध्यार्थ्यानी आपल्या ठरलेल्या वेळेत स्थळ – पंचशील हायस्कुल नांदेपेरा. येथे दि. २१ / ०१ / २०२६ ला ठिक १०.०० उपस्थित राहण्याचे आव्हान माजी विद्यार्थी आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिलीप जगन्नाथरावजी पेचे.
कार्यक्रमाचे उद्घाटक – सुरुसे सर.( माजी मुख्याध्यापक )
प्रमुख पाहुणे -सर्व माजी शिक्षक उपस्थित राहतील.

सुचना माजी विद्यार्थी मेळावा २१जानेवारी ला होत असल्यामुळे हा मेळावा सर्व माजी विद्यार्थी (माच`८७ बॅच ,) मीळुन घेत आहो .याकरीता यथाशक्ती आर्थिक मदत करायची असल्यास   प्रकाश चीकटे(९६२३२४२१७०) यांचेशी संपर्क करावा.