विध्यार्थी गल्लीमध्ये उभा असेल आणि…..
एक काळ असा होता
की विध्यार्थी गल्लीमध्ये उभा असेल आणि दूरून शिक्षण दिसले. तरी मुल आपोआप गल्ली बदलून निघून जायची. भीती नव्हती पण जबाबदारी मनात खोलवर रूजलेली होती. शिक्षण काही बोलतील याची भीती नसून त्यांनी पाहिलं तरी आपण चुकीचं वागतोय ही जाणीव होती. शिक्षक म्हणजे फक्त शिकवणारा नव्हे.तर घडवणारा आधार असायचा त्यांचा एक शब्द घरापर्यंत पोहचेल याची खात्री प्रत्येक मुलाला असायची. आणि घरी पोहचल्यावर त्या शब्दाला किंमत दिली जाईल यावर पालकांचा ठाम विश्वास असायचा पालक आणि शिक्षक न बोलता तयार झालेली एक मजबूत साखळी होती. त्या साखळी शिस्त होती. संस्कार होते. आणि भविष्य घडविण्याची तळमळ होती. आज मुलं शिक्षकांना घाबरत नाहीत. पण स्वतःच्या जबाबदारीलाही घाबरत नाहीत. हीच खरी भीती आहे. घर आणि शाळा वेग- वेगळ्या दिशेने खेचू लागल्यावर मुलं मधेच हरवतात. तेव्हा शिस्त तुटते. आदर कमी होतो. आणि शिक्षण फक्त्त पुस्तकापुरतं उरत. तो काळ कठोर वाटायचा पण आज मागे वळून पाहिलं की समजतं. त्या कठोरपणातच माणूस घडायचा
पण आज तसं राहिले नाही. शिक्षक आणि विध्यार्थी यांच्यातलं दिवसेंदिवस नात दुरावली जात आहे. पहिले मुल पानटपरीवर दिसाचे नाही. टपरीवर चुकून गेलंय तरी पालक, शिक्षक किंवा गावातील वरीष्ठ व्यक्तीने बघितलं तर काय? आपला सात बारा होईल अशी मनात भीती निर्माण व्हायची. त्या काळात घुटका सुगंधी तंबाखू मिस्रीत खर्रा मिळायचा नाही. खर्रा म्हणजे काय हेच माहित नव्हतं एखादाच शिक्षक टपरीवर साधा मसाला पाण खातला जायचे. पण आज तसे काहीच राहील नाही. शिक्षक, पालक आणि मुलं एकत्र मिळुन खर्रा खातांना दिसू लागले आहे.यामुळे शिक्षक आणि विध्यार्थी यातील भीती नष्ट होत आहे. पुर्वीची मुल शाळेला सुट्ट्या लागल्याकी काहीतरी रोजगार शोधायला शहरात निघून जायची पण आजची परीस्थिती तशी राहीली नाही. मुलं कामाला न जाता फालतू शोक खर्रा दारू पिऊन वादावादी गावात टवाळ्या करतात कारण यांना कुणाचीच भीती नसतात.
आधीचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातील बदल होता. पूर्वीची आदरयुक्त भीती आणि सध्याची मैत्रीपूर्ण जवळीक यावर भर देतात; ज्यात जुन्या काळात शिक्षक हे गुरू-शिष्य नात्याप्रमाणे आदरणीय असत, तर आजच्या काळात ते मित्र किंवा मार्गदर्शकाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारे आणि त्यांना योग्य दिशा देणारे दुसरं पालकच असतात, असे विविध दृष्टिकोन मांडले आहेत. जुने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाते यात आदर आणि भीती पूर्वी शिक्षक म्हणजे देवासमान मानले जायचे. त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आणि थोडी भीतीही असायची. शिक्षक दिसताच विद्यार्थी रस्ता बदलायचे, असेही अनुभव सांगितले जातात.
शिस्तीला महत्त्व: शिक्षकांनी दिलेली शिस्त आणि मूल्ये विद्यार्थ्यांच्या जीवनाचा भाग बनत असत. शिक्षक हे केवळ पुस्तकी ज्ञान न देता, संस्कार आणि नैतिक मूल्यांचे शिक्षणही देत असत.आजचे शिक्षक आणि विद्यार्थी हे शिक्षक अधिक मैत्रीपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या जवळचे असतात. ते विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना मार्गदर्शन करतात.मार्गदर्शक आणि मित्र शिक्षकाची भूमिका केवळ शिकवण्यापुरती मर्यादित नसून, ते विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, समुपदेशक आणि प्रेरणास्थान बनले आहेत. ते विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देतात.
ज्ञानापेक्षा माहिती आज माहिती सहज उपलब्ध असली तरी, त्यातून ज्ञान कसे मिळवायचे यासाठी शिक्षकांची गरज आहे. शिक्षक माहिती आणि ज्ञान यातील फरक समजावून सांगतात. सर्वांगीण विकास: आजच्या शिक्षकांकडून केवळ अभ्यास न घेता, विद्यार्थ्यांचा खेळ, कला आणि स्पर्धा परीक्षांमधून सर्वांगीण विकास साधण्याची अपेक्षा असते.थोडक्यात, जुन्या काळातील शिक्षक
वास्तविक विद्यार्थी कधीच एकसारखी नसतात. त्यामुळे त्यांना एकच फूटपट्टी, परिमाण लागू होत नाही. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा सर्व स्तरांवरील वैविध्य विद्यार्थ्यांतही स्वाभाविकपणे असते. हे वैविध्य, कौटुंबिक पार्श्वभूमी, घरातील-परिसरातील वातावरण आणि वैयक्तिक बुद्धिमत्ता आदी घटक विद्यार्थ्यांना घडवत असतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. म्हणूनच ‘आजचा विद्यार्थी अतिशय स्मार्ट आहे’ किंवा ‘आजच्या विद्यार्थ्यांना काहीही येत नाही’ अशी सरसकट विधाने करता येत नाहीत…..
*पत्रकार : राजेश येसेकर मु. ता. भद्रावती जि. चंद्रपूर मो. 7756963512*


