Home Breaking News • चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा • प्रजासत्ताकदिनी...

• चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा • प्रजासत्ताकदिनी दिल्लीत सोनापूर देशपांडेचे सरपंच जयाताई दिपक सातपुते यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण

409

चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत सोनापूर देशपांडेचे सरपंच जयाताई दिपक सातपुते यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण

Oplus_16908288

गोंडपिपरी (विनोद पाल):-राजधानी दिल्ली येथे 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यात तालुक्यातील सोनापूर देशपांडे ग्रामपंचायतीचे सरपंच जयाताई सातपुते व त्यांचे पती दिपक सातपुते यांना केंद्र शासनाने विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातून केवळ सोनापूर देशपांडे गावालाच हा सन्मान मिळाल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हा सन्मान मिळाल्याची अधिकृत माहिती महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव वैशाली डिगे यांनी दिलेल्या पत्राद्वारे सरपंच जयाताई सातपुते यांना कळविण्यात आली आहे.केंद्र शासनाकडून आलेल्या या निमंत्रणामुळे सोनापूर देशपांडे गावाचे नाव थेट राष्ट्रीय पातळीवर पोहचले असून ग्रामीण भागातील उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आल्याचे स्पष्ट होते.ग्रामीण भागात राहूनही ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचा तसेच समाजात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्याचा हा उपक्रम केंद्र शासनाच्या विशेष दृष्टीस पडला.त्याचाच परिपाक म्हणून सोनापूर देशपांडे ग्रामपंचायतीला विशेष अतिथी म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.दिल्ली येथील कर्तव्यपथावर पार पडणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते,लोकप्रतिनिधी आणी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात सोनापूर देशपांडे गावाचे प्रतिनिधित्व होणे ही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी गौरवाची बाब मानली जात आहे.

विविध पुरस्कार,उपक्रम व विकासकामामुळे मिळाली राष्ट्रीय ओळख….

सन – 2017-2018 मध्ये हागणदारीमुक्त गाव अंतर्गत स्वच्छ भारत मिशन मोहिम यशस्वी करण्यात आली,सन-2019-2020 मध्ये स्मार्ट ग्राम अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त,सन-2019-2020 मध्ये स्मार्ट ग्राम अभियानात जिल्हात प्रथम क्रमांक प्राप्त,सन-2020-2021 मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त,जिल्हात पहिली पेपरलेस ग्रामपंचायत डिजीटल आपले सरकार सेवा केंद्र म्हणुन सन्मान,तालुक्यातील आदर्श शाळा म्हणुन शाळा विकसित होत आहे,मुख्यमंत्री माझी शाळा अभियानात शाळेला तालुक्यात तिसरा क्रमांक प्राप्त झाला व विविध उपक्रमातून सोनापूर देशपांडे गावाची राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली आहे.