Home Breaking News #Ballarpur • नगरसेवक गोलू डोहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिकल सेल व रक्ततपासणी शिबिर

#Ballarpur • नगरसेवक गोलू डोहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिकल सेल व रक्ततपासणी शिबिर

138
Oplus_16908288

#Ballarpur
• नगरसेवक गोलू डोहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिकल सेल व रक्ततपासणी शिबिर

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

Oplus_16908288


बल्लारपूर : बालाजी वॉर्ड, बल्लारपूर येथील शासकीय दवाखान्यामागे दिनांक २३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक गोलू डोहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिकल सेल व रक्ततपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरास नगरसेवक गोलू डोहाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष इंजि. राकेश सोमाणी, प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका साजिया शाहिद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते शाहिद शेख तसेच शीतल इंगळकर, शुभांगी लोखंडे, रुणाली डांगे, सपना बर्वे, भावना खोब्रागडे, शब्बीर शेख, आरती ढेंगर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या उक्तीचा प्रत्यय देत, समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे सिकल सेल तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच सिकल सेल आजाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि योग्य उपचारांची माहिती देण्यात आली.

यावेळी बोलताना नगरसेवक गोलू डोहाणे म्हणाले, “माझ्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्याचा मला आनंद आहे. नागरिकांनी दिलेल्या प्रेम, सन्मान आणि सदिच्छांबद्दल मी मनापासून आभारी आहे. पुढील काळातही आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

या शिबिरामुळे परिसरातील नागरिकांना मोठा लाभ झाला असून उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.