Home Breaking News महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर!

महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर!

119

महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर!

चंद्रपूर दि.,२१ किरण घाटे
महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटना रा

ज्य स्तर, विभाग स्तर, जिल्हा व तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांनी कालपासून ( दि.२१जानेवारी) संघटनेच्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे.तीन महिने उलटून गेले परंतु त्यांना अद्याप मानधन मिळालेले नाही .या शिवाय नियुक्ती पत्रक ही मिळालेल नाही . सध्या स्थितीत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यास्तव हिवाळी अधिवेशन काळात ठिय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते, तसेच मंत्री महोदयांनी मीटिंग लाऊन तोडगा काढ्याबाबत आश्वस्त केले होते. अद्याप मीटिंग झाली नसल्याने तसेच आता पावेतो रास्त मागण्या पूर्ण न झाल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचारी यांनी जिल्हा स्तरावर
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर तसेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चंद्रपूर यांना दि. 20 जानेवारी 2026 ला काम बंद बाबत निवेदन दिले आहे.

निवेदन देताना राज्य संघटना कार्याध्यक्ष-उपाध्यक्ष कु. दीपाली जवळे, मीनाक्षी क्षीरसागर,
तालुका स्तरावरील जिल्हाध्यक्ष प्रकाश घडसे, सचिव प्रणित बोबाटे, सहसचिव नितीन वेलपुलवार, स्वप्निल भगत, महेश शेळके, राजू चंदनबावणे, राजेंद्र खोब्रागडे, अंगद गुंडले, सचिन भसारकर ,सचिन बुरांडे, प्रफुल करपे, पंकज झुरे, गौरव सोरते, कु. पल्लवी पराते, कु.दर्शना बुरडकर, आदिं उपस्थित होते.