Home Breaking News #Bhadravti • ३९ वर्षांनंतर पुन्हा एकत्र… आठवणींना उजाळा देत नांदेपेरात स्नेहमेळाव्याचा भावनिक...

#Bhadravti • ३९ वर्षांनंतर पुन्हा एकत्र… आठवणींना उजाळा देत नांदेपेरात स्नेहमेळाव्याचा भावनिक सोहळा

39

#Bhadravti
• ३९ वर्षांनंतर पुन्हा एकत्र…
आठवणींना उजाळा देत नांदेपेरात स्नेहमेळाव्याचा भावनिक सोहळा

Oplus_16908288

सुवर्ण भारत:राजेश येसेकर,भद्रावती प्रतिनिधी

पंचशील शिक्षण प्रसारक समितीच्या वतीने संचालित पंचशील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नांदेपेरा येथे तब्बल ३९ वर्षांनंतर इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. सन १९८६–८७ च्या अ, ब, क तुकडीतील माजी विद्यार्थी व शिक्षक या मेळाव्यासाठी एकत्र आले होते.

दिनांक २१ जानेवारी २०२६, बुधवार रोजी झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य सुरूशे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर बिरसा मुंडा व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. जगन्नाथराव पेचे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी पंचशील शिक्षण प्रसारक समितीचे अध्यक्ष दिलीपराव पेचे अध्यक्षस्थानी होते. तर माजी प्राचार्य आसुटकर, बेलेकर, माजी प्राध्यापक उपरे, शिरभाते, मगरे, तसेच माजी कर्मचारी रामकृष्ण वाटेकर, श्रावण खोले, वामन तोडासे, संचालक खंडाळकर, चिकटे, घाटे, शरदराव पेचे, भुमिका मत्ते, प्रभावती खामणकर, चहाणकर, धोटे ताई व सौ. कन्हाके यांची मान्यवर म्हणून उपस्थिती होती.

कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत भावनिक मनोगत व्यक्त केली, तर काहींनी सुंदर गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंग भरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रणाली जुनघरे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य घनश्याम पाटील यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन बंडू टोगे यांनी केले.

३९ वर्षांनंतरही मैत्रीचा धागा तसाच घट्ट असल्याचे चित्र या स्नेहमेळाव्यातून पाहायला मिळाले, आणि नांदेपेराच्या पंचशील शाळेच्या इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला.