नांदगावमध्ये पिकअपने पादचाऱ्याला उडविले;
२ जागीच ठार तर १३ जण जखमी
चंद्रपूर : विशेष प्रतिनिधी

तेलंगाना येथून रोवण करून परत येत असताना पीकअप वाहनाने एका पादचाऱ्याला धडक दिल्यानंतर वाहन पलटी होऊन भीषण अपघात झाला.या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत.ही घटना काल दि. २१ जानेवारी २०२६ ला सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास मुल तालुक्यातील नांदगाव येथे लक्की बारच्या बाजूला घडली.
अपघातात शेतातून शौचासाठी जाऊन परत येत असलेले हरिदास मेटपलीवार (वय ३५) यांना पीकअप क्रमांक.MH 34 BZ 3127 या वाहनाने जोरदार धडक दिली.धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्याच्या कडेला पलटी झाली.या अपघातात पीक अप मध्ये प्रवास करीत असलेल्या डोंगरहळदी येथील रहिवासी सौ.वनिता भिकारु मरसकोल्हे (वय 40) यांचा जागीच मृत्यू झाला.तसेच १३ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.गंभीर जखमी महिलेला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून उर्वरित जखमीवर मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे.विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सी.सी.टी.व्ही.कॅमेरात कैद झाली असून त्यांच्या आधारे पुढील तपास तपास करण्यात येत आहे.


