Home Breaking News भारत मातेचा सैनिक 🟧सौ. शैला चिमड्यालवार सावली

भारत मातेचा सैनिक 🟧सौ. शैला चिमड्यालवार सावली

54

भारत मातेचा सैनिक

🟧सौ. शैला चिमड्यालवार सावली

 

भारत मातेचा सैनिक

माता पित्यांचा पुत्र

देश सेवेच्या संरक्षणार्थ

हाती घेती रक्षण सूत्र..

 

परिवाराची माया सोडूनि

जाती त्वरेने लढायला

पुढेच पुढे जायचे आता

देशाचे ध्येय गाठायला…

 

भारत माता की जय

नारा लावुनी घेती धाव

रणंगणी क्रांती घडूनि

येई हो विश्वाचे नाव..

 

अखेर विजयी भव होती

नाव मिळवूनी भारताचे

सन्मानाने तिरंगा फडकवि

हे क्षण लाभले मानाचे..

 

कित्येक होती गतप्राण

त्या परिवाराची आरोळी

जे परतुनी येती वीरजवान

तिथे साजरी दिवाळी..