Home Breaking News #Varora #chandrapur • शेतातील मोटार पंप चोरी करणारे दोघांना अटक ...

#Varora #chandrapur • शेतातील मोटार पंप चोरी करणारे दोघांना अटक • दोन मोटार पंप व केबल ६९,०००/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त • वरोरा पोलीसांची धडक कारवाई

47
Oplus_16908288

#Varora #chandrapur

• शेतातील मोटार पंप चोरी करणारे दोघांना अटक

• दोन मोटार पंप व केबल ६९,०००/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

• वरोरा पोलीसांची धडक कारवाई

सुवर्ण भारत : सुनील हिंगणकर

चंद्रपूर :- दिनांक २३/०१/२०२६ रोजी रितीक संजय थेरे यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार नोंदविली की, त्यांचे शेतातील व शेजारील शेतकरी यांचे शेतातील दोन मोटार पंप व केबल असा एकुण ६९,०००/- रुपयाचा माल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला.

वरोरा पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गोपनिय बातमीदार नेमुन सीसीटीव्ही फुटेज पाहणी करुन तंत्रबध्द पध्दतीने सखोल तपास केला असता यातील आरोपी (१) सिताराम आसाराम भिसे व आरोपी (२) सुनिल रामप्रसाद साळुंखे दोन्ही रा. गोकुलनगर वणी जि. यवतमाळ यांना अटक करुन त्यांचे कडुन गुन्हयातील चोरीस गेलेला संपुर्ण माल हस्तगत केला आहे.

पुढील कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, संतोष बाकल, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांचे नेतृत्वात सपोनि शरद भस्मे, पोहवा /२२४४ दिलीप सुर, पोहवा /२५७१ संदीप मुळे, पोअं/२६४३ महेश गावतुरे, पोअं/१०५३ सौरभ कुलथे यांनी केली आहे.