• नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यावर ॲट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा- भीम आर्मीची मागणी
• चंद्रपूर जिल्हाधिकारी मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर!
चंद्रपूर : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक घेतले नाही.ज्या महामानवाने अहोरात्र परिश्रम घेवून भारताला जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना दिली. त्या महामानवाचे नाव न घेणे हा विसर नसून जाणीव पूर्वक केलेले कृत्य आहे.त्यामुळे हा केवळ अनुसूचित जाती,जमातीच्या आंबेडकर अनुयायांचा अपमान नसून सर्व देशवाशियांचा व संविधानाचा अपमान आहे.सदरहू प्रकार हा अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा १९८९नुसार तसेच भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा ठरतो तेव्हा या प्रकरणात आपण जातीने लक्ष पूरवून पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यावर ॲट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास भाग पाडावे अशी मागणी चंद्रपूर जिल्हा भीम आर्मीच्या वतीने आज दि.२९जानेवारीला चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
निवेदन सादर करताना सुरेंद्र रायपूरे, विशाखा आमटे, हिमांशू आवळे, राजू सोदारी, भिमराव आमटे,रेखा धोटे, छबी धोटे आदिं उपस्थित होते.



