Home Breaking News • सुरक्षा नियमांची आठवण करून दिल्याचा राग; पत्रकारास अश्लील शिवीगाळ व जीवे...

• सुरक्षा नियमांची आठवण करून दिल्याचा राग; पत्रकारास अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी • बल्लारपूर शहरात खळबळ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

143

• सुरक्षा नियमांची आठवण करून दिल्याचा राग; पत्रकारास अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

• बल्लारपूर शहरात खळबळ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

बल्लारपूर :- सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने कामगारांना

Oplus_16908288 पी

सुरक्षा साधने वापरण्याची साधी सूचना दिल्याचा राग मनात धरून एका पत्रकारास भर रस्त्यात अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर व चिंताजनक घटना बल्लारपूर शहरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरातील पत्रकार व सुज्ञ नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रविंद्रनगर वार्ड, बल्लारपूर येथील रहिवासी तथा पत्रकार रमेश शितलप्रसाद निशाद (वय ४९) यांनी या प्रकरणी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजता ते आपल्या मित्रासोबत इम्प्लिकेट गार्डन, वनविकास महामंडळ कार्यालयाच्या मागील परिसरात सकाळी फिरण्यासाठी गेले होते.
यावेळी काही कामगार ओव्हरलोड ट्रकमधून कोणतीही सुरक्षा साधने न वापरता अत्यंत धोकादायक परिस्थितीत लाकूड उतरवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कामगारांच्या डोक्यावर हेल्मेट, पायात बूट व अन्य आवश्यक सुरक्षा साधने नसल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पत्रकार निशाद यांनी त्यांना सुरक्षा साधने वापरण्याची सूचना केली.
मात्र, या सूचनेचा राग आल्याने तेथे उपस्थित असलेल्या आरोपी   ठेकेदार  याने, “हाच तो पत्रकार आहे, याने याआधी आमच्याविरोधात बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत,” असे म्हणत इतर लोकांना एकत्र केले. त्यानंतर पत्रकाराशी वाद घालत त्यांना अत्यंत अश्लील, अपमानास्पद शिवीगाळ करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता, “येथे व्हिडीओ काढायचे नाहीत, पुन्हा येथे दिसलास तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेमुळे आपल्याला जीविताचा गंभीर धोका निर्माण झाल्याचे सांगत पत्रकार रमेश निशाद यांनी तात्काळ बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६ व ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे करीत आहेत. पत्रकारास जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघटना व नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.