#Bhadravti
• केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात कामगार संघटनाचा देशव्यापी संपात सहभागी व्हावे : राजू गैनवार
भद्रावती
तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती : – येथील आयटक ( a i t u c ) – आल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस कार्यालय येथे नुकतीच सभा घेण्यात आली दिनांक 12 फेब्रुवरी दुपारी 1 : 00 वाजता तहसील कार्यालय परिसर भद्रावती येथे भव्य धरणा निदर्शने कार्यक्रम होणार आहेत तरी कामगारांनी उपस्थित राहावे सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे आणि नवीन आर्थिक धोरणामुळे कामगार संघटनाची शक्ती खिळखीळी झाली आहे देशातील सर्व कामगारांनी लढून मिळवलेले सर्व कायदे बासनात गुंडाळले जात आहेत सन 1920 ते 1947 दरम्यान देशात अनेक कायदे निर्माण झाले आणि या सर्व लढ्यामध्ये कामगारांचा सहभाग मोठा होता याचा आयटकला अभिमान आहे आयटक संघटनेने सर्व केंद्रीय कामगार संघटना कृती समितीने पुकारलेल्या दिनांक 12 फरवरी देशव्यापी सार्वत्रिक संपामध्ये संपूर्णपणे सहभागी व्हावे असे प्रतिपादन कॉम्रेड राजू एम
गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा संघटक आयटक कामगार नेते यांनी केले आहे
प्रमुख मागण्या : — (1) केंद्र सरकार द्वारा लागू श्रमिक विरोधी चार श्रम संहित त्वरित मागे घेऊन या संहिता लागू करणे संबधी दिनांक 21नोव्हेंबर 2025 रोजी अचानक जरी केलेली अधिसूचना रद्द करा ( 2 ) सामान काम सामान वेतन लागू करा ( 3 ) खाजगीकरण व व्यापारीकरण बंद करा ( 4 ) महागाई व दरवाढ कमी करा ( 5) राज्य शासनाकडे प्रलंबित आशा वर्कर — अंगणवाडी कर्मचारी – शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करा ( 6 ) स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्या व इतर मागण्या राहणार आहेत
या संपात वेकोली ( डब्यु सी एल )- आयुध निर्मानी डिफेन्स ( ओ एफ सी ) – पोस्ट आफिस – बँक – एल आ सि (भारतीय बिमा निगम ) – रेल्वे – शालेय पोषण आहार कर्मचारी – आशा वर्कर – शासकीय – निमशासकीय कर्मचारी सहभागी होतील
होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचे आवाहन कॉ राजू गैनवार – कॉ रवींद्र उमाटे – कॉ प्रकाश रेड्डी – कॉ अरविंद कुमार कॅप्टन – कॉ शकील शेख – कॉ सुरेश कांबळे – कॉ छाया मोहितकर – कॉ नसरीन खा पठाण – कॉ लता देवगडे इत्यादिनीं केले आहे
