रमाबाई आंबेडकर यांची 128 वी जयंती उत्साहात साजरी
सुवर्ण भारत:पंकज रामटेके (सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर)
घुग्घुस : दिनांक 07 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता, घुग्घुस येथील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात सौ. माता रमाबाई आंबेडकर यांची 128 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यांच्या कार्यास उजाळा दिला.
या कार्यक्रमाला भाजपा घुग्घुस शहराध्यक्ष श्री. संजय तिवारी, रामपाल वर्मा, संजय भोंगळे, प्रेमलाल पारधी, राजेंद्र लुटे, महेंद्र बाग, स्वप्नील वाढई, मुन्ना लोडे, चिन्नाजी नलबोगा, गणेश शेंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या त्याग, समर्पण व संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रम शांततामय व उत्साही वातावरणात पार पडला.
