Home Breaking News #Mul #chandrapur • जनसेवक पुरस्काराने सुरेश खडसे यांचा गौरव

#Mul #chandrapur • जनसेवक पुरस्काराने सुरेश खडसे यांचा गौरव

74

#Mul #chandrapur
• जनसेवक पुरस्काराने सुरेश खडसे यांचा गौरव

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

Oplus_131072

मुल : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मुल येथील दुर्गा मंदिर सभागृहात भव्य जनसेवक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात घुग्घुस येथील नवनियुक्त तालुका अध्यक्ष श्री. सुरेश खडसे यांना त्यांच्या उल्लेखनीय जनसेवक कार्याबद्दल जनसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मराठी पत्रकारितेचे जनक जनक बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे मा. पोलीस उपनिरीक्षक सत्यजीत आमले व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली.

या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने विदर्भातील अनेक पत्रकारांना जनसेवक सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी विदर्भातील पत्रकारांनी प्रा. महेश पानसे यांच्या कार्याचा गौरव करत मनोगत व्यक्त केले. “प्रा. पानसे यांच्या कार्यावर आयुष्यभर लिहिले तरी ते अपुरेच ठरेल,” असे गौरवोद्गार दै. महासागरचे प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटक घुग्घुस कु. पंकज रामटेके यांनी काढले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे कार्याध्यक्ष तथा दैनिकाचे अनुभवी ज्येष्ठ संपादक श्री. निलेश सोमाणी यांनी भूषविले.

याप्रसंगी विदर्भातील शेकडो पत्रकार, मुल नगरपालिकेचे नगराध्यक्ष व सभापती, पोलीस उपनिरीक्षक सत्यजीत आमले, डॉ. बंडू रामटेके, आजी-माजी नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.