Home Breaking News भाजप श्रेष्ठींची यशस्वी व्यूहरचना व सामूहिक प्रयत्नांमुळे चंद्रपूर महापालिकेत भाजपाची सत्ता –...

भाजप श्रेष्ठींची यशस्वी व्यूहरचना व सामूहिक प्रयत्नांमुळे चंद्रपूर महापालिकेत भाजपाची सत्ता – हंसराज अहीर

45
Oplus_131072

भाजप श्रेष्ठींची यशस्वी व्यूहरचना व सामूहिक प्रयत्नांमुळे चंद्रपूर महापालिकेत भाजपाची सत्ता – हंसराज अहीर

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीत भाजपाला अपयश आले असले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षश्रेष्ठींनी वेळेवर लक्ष घातल्याने नव्या राजकीय समिकरणातून चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपाचा महापौर बसविण्यात पक्षाला यश मिळाले, याचा विशेष आनंद असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

नवनिर्वाचित महापौर सौ. संगीता खांडेकर व उपमहापौर प्रशांत दानव यांचे अभिनंदन करताना अहीर यांनी सर्व भाजप नगरसेवक, महायुतीतील घटक पक्ष तसेच नव्या समिकरणातून सोबत आलेले शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे आणि अपक्ष नगरसेवक नंदू नागरकर यांचेही मनःपूर्वक अभिनंदन केले.

महानगरपालिका निवडणुकीचे प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला पुन्हा सत्तेत बसविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले. अपक्ष व उबाठा गटासोबत समन्वय साधण्यास प्रदेशस्तरावरून परवानगी व प्रभावी मार्गदर्शन मिळाल्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकेत भाजप व सहयोगी पक्षांची सत्ता स्थापन झाली. नगर परिषद निवडणुकीतील पराभवाचा वचपा यशस्वीपणे काढण्यात आल्याचा विशेष आनंद असल्याचे अहीर यांनी नमूद केले.

नगर परिषद निवडणुकीतील पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याला विशेष ताकद देण्याची ग्वाही दिली होती.

त्यानुसार मिळालेली अतिरिक्त राजकीय ताकद, नगरसेवक व कार्यकर्त्यांची प्रामाणिकता, अविश्रांत परिश्रम आणि सर्व नेत्यांनी सामूहिकपणे केलेले प्रयत्न यामुळेच हे यश साध्य झाले, असेही अहीर म्हणाले.

भाजपा, महायुती, शिवसेना (उबाठा) व अपक्षांच्या सहकार्याने भाजपाचा महापौर सत्तेत बसणे हे चंद्रपूरच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण घडामोड असून सर्व सहभागी घटकांचे हे यश अभिनंदनीय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.