मौजा चिंचोली येथे रो से यो शिबीर संपत्र

ब्रम्हपुरी:- ने. हि. महाविद्यालयाल तथा शांताबाई भैया महिला महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथिल राष्ट्रीय सेवा योजना सात दिवसीय निवासी शिबीर मौजा चिंचोली येथे संपत्र झाले. या सात दिवसीय शिबीराचा समोरोपीय सोहळा नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी चे उपाध्यक्ष प्रकाश भैया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याकार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद बानबले ठाणेदार पोलिस स्टेशन, ब्रम्हपुरी, श्री. गजानन ढोरे सरपंच ग्रा. पं चिंचोली,रामलालजी ढोरे उपसरपंच, धनराज मेश्राम,अध्यक्ष, शाळा समिती, गिरिधरजी बुल्ले अध्यक्ष, तंटामुक्ती समिती, रधुनाथजी पारधी, प्राचार्य डाँ एस. एम. शेकोकर, ने हि महा., प्राचार्य डाँ एम. एस. वरभे शांताबाई भैया महिला महा. मेजर विनोद नरड, शिबीर प्रमुख डाँ प्रकाश वट्टी व ग्राम सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रकाशजी भैया यांनी रोसेयो शिबीर हे राष्ट्रनिर्माण कार्यात युवक घडविण्याचे कार्य करते, पुज्यनिय महात्मा गांधीजींचे स्वप्न होते की, खेडयांचा विकास झाला पाहिजे त्यासाठी या देशातील युवक हा घडणे आवश्यक आहे. म्हणून युवकांना सामाजिक मूल्यसंवर्धनाची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठीय शिक्षणात समावेश करण्यात आले असे मार्मीक विचार व्यक्त केले. तर प्रमुख अतिथी प्रमोद बानबले यांनी अशा महाविद्यालयीन शिबीरातून विद्यार्थी हे घडतात त्यांना जिवन कसे जगावे याचे प्रत्यक्ष धडे गिरवायला मिळतात म्हणून असे शिबीर विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळवून देणारे ठरतात असे मत व्यक्त केले. यासात दिवसीय शिबीराचा अहवाल डाँ प्रतिभा कढव यांनी सादर केला. तर कल्याणी राऊत व सौरभ तलमले यांनी शिबीरातून खुप काही शिकायला मिळाले असे भावना व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाँ दर्शना उराडे यांनी केले तर आभार शिबीर प्रमुख डाँ प्रकाश वट्टी यांनी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्यक्रमाधिकारी डाँ अभिमन्यू पवार,तंत्रसहायक गोपाल करंबे, संजू मेश्राम, अनिकेत शेंडे, गणेश बगमारे, गणेश धनजुले, प्रमोद ढोरे,कार्तीक गुरुनुले,प्रणय, अजय बरडे, पराग शेंडे, मानस गेडाम, लोमेश, अजय, चिन्मयी मडावी व रासेयो स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
