Home Breaking News #Gadchiroli #Aheri • महाशिवरात्री जत्रा निमित्त ‘आई तू माझी होशील का?’...

#Gadchiroli #Aheri • महाशिवरात्री जत्रा निमित्त ‘आई तू माझी होशील का?’ दंडार कार्यक्रमाचे आयोजन • माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते उद्घाटन

180
Oplus_131072

#Gadchiroli #Aheri

• महाशिवरात्री जत्रा निमित्त ‘आई तू माझी होशील का?’ दंडार कार्यक्रमाचे आयोजन

• माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते उद्घाटन

Oplus_131072

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

अहेरी : तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील प्राणहिता नदी घाट परिसरातील वांगेपल्ली येथील शिव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्त भव्य जत्रेचे आयोजन करण्यात आले. या जत्रेनिमित्त मंदिर परिसरात ‘आई तू माझी होशील का?’ या दंडार सांस्कृतिक कार्यक्रमाचे रात्री उत्साहात आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी परिसरात मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना राजे अम्ब्रीशराव महाराज म्हणाले की, महाशिवरात्री निमित्त वांगेपल्ली घाट येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जत्रा भरते. महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातून हजारो शिवभक्त दर्शनासाठी येथे येतात. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता पुढील वर्षी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

तसेच आगामी महाशिवरात्रीपूर्वी येथे भव्य नवीन शिवमंदिर उभारण्याच्या कामास प्रारंभ करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी उपस्थित भाविकांना दिले. यावेळी त्यांनी सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत भक्तांनी शांतता व भक्तिभाव जपावा, असे आवाहन केले.

जत्रेनिमित्त अहेरी परिसरातील विविध गावांबरोबरच तेलंगणा राज्यातील हजारो शिवभक्तांनी मोठ्या भक्तिभावाने उपस्थिती लावली. मंदिरात दर्शनासाठी दिवसभर रांगा लागल्या होत्या. दंडार कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सांस्कृतिक सादरीकरणाचा आनंद घेतला.

या कार्यक्रमास युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, शिव मंदिर कमेटी वांगेपल्लीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.