Home Breaking News म्हातारदेवी येथे शिवजयंती उत्सव कमेटी तर्फे दोन दिवसीय भव्य कबड्डी सामने आयोजित

म्हातारदेवी येथे शिवजयंती उत्सव कमेटी तर्फे दोन दिवसीय भव्य कबड्डी सामने आयोजित

46
Oplus_131072

म्हातारदेवी येथे शिवजयंती उत्सव कमेटी तर्फे दोन दिवसीय भव्य कबड्डी सामने आयोजित

सुवर्ण भारत : पंकज रामटेके सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस येथील अंदाजे ४ किलोमीटर अंतरावर असलेले म्हातारदेवी गावातील छावा गणेश मंडळ व शिवजयंती उत्सव कमेटी म्हातारदेवी तर्फे दोन दिवसीय भव्य पुरुषाचे कबड्डी सामने प्रथम वर्ष आयोजित करण्यात आले.

 

सर्वप्रथम प्रमुख पाहूणे जेष्ठ मान्यवर यांच्या शुभ हस्ते महामानव प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतिवीर बिरसा मुंडा,माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस द्विपजवलीत करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

 

प्रमुख पाहुणे म्हणुन कार्यक्रमांचे उद्धाटक राजकन्या ताकसांडे सामाजिक कार्यकर्ते,सहउद्धाटक सरपंच सौ. संध्या पाटील,मा.सरपंच संजय टिपले,गजानन गोहणे,संतोष ढेगळे,अनिल डोंगरे, दंतात्रय भोयर मंचावर उपस्थित होते.

 

तसेच सत्कारमुर्ती सौ.मालाताई मेश्राम महिला व बालकल्याण विभाग सभापती,श्री.संजय साळवे, श्री.सुरेश खडसे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई तालुका अध्यक्ष तसेच रवी डोर्लीकर सक्सेस अकॅडमी घुग्घुस या सर्व प्रमुख पाहुणेला शाल, श्रीफल, समानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आले.

बरेच मान्यवरांनी आपआपले मनोगत व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी छावा गणेश मंडळ व शिवजयंती उत्सव कमेटी तसेच समस्त गावकरी नागरिक उपस्थित होते.