Home Breaking News चिमूरमध्ये २२ फेब्रुवारीला ‘विराट हिंदू संमेलन’; – विविध मान्यवरांची उपस्थिती

चिमूरमध्ये २२ फेब्रुवारीला ‘विराट हिंदू संमेलन’; – विविध मान्यवरांची उपस्थिती

150

चिमूरमध्ये २२ फेब्रुवारीला ‘विराट हिंदू संमेलन’; – विविध मान्यवरांची उपस्थिती

प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर

चिमूर :- सकल हिंदू समाज, बालाजी वस्ती (चिमूर नगर) यांच्या वतीने रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता अभ्यंकर मैदान (किल्ला), चिमूर येथे ‘विराट हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. समाजाची एकात्मता, सांस्कृतिक वारसा जपणे व हिंदू प्रबोधनाच्या दिशेने नवी ऊर्जा निर्माण करणे हा या संमेलनाचा उद्देश असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

या संमेलनाचे प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय धर्मजागरण प्रलेखन टोली सदस्य अनंतराव बुजोणे उपस्थित राहणार आहेत. तसेच खेमदेवजी कापसे महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळ, कोटगाव सरदार कन्हैयासिंग भौंड सदस्य, सिखलीकर शिख संघटन महाराष्ट्र राज्य, इ.ब. राजेंद्र मुनी सेवतकर महानुभाव, वडाळा पैकू, डोमाजी ठोंबरे मार्गदर्शक, परमात्मा एक, भिसी. गोपाल सिरास महाराज चिमूर.तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. मयुरी आशिष असावा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी १.३० वाजता गीत व वेशभूषा सादरीकरणाने होईल. दुपारी ३.०० वाजता बालाजी मंदिर येथून भव्य कलश यात्रा काढण्यात येणार असून ती बालाजी वस्ती परिसरातून भ्रमण करत कार्यक्रम स्थळी पोहोचेल. दुपारी ४.०० वाजता मुख्य कार्यक्रमास प्रारंभ होईल. सायंकाळी ५.३० वाजता भारत माता आरती होणार असून कार्यक्रमानंतर लगेच भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संत-महात्म्यांचे आशीर्वाद लाभावेत व समाजात नवी चेतना निर्माण व्हावी या हेतूने आयोजित या संमेलनास सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाज, बालाजी वस्ती, चिमूर नगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.