Home Breaking News #Chimur • चिमूर दुचाकी व ट्रॅव्हलरचा भीषण अपघात – हितेश एकाचा...

#Chimur • चिमूर दुचाकी व ट्रॅव्हलरचा भीषण अपघात – हितेश एकाचा मृत्यू

1088

#Chimur

• चिमूर दुचाकी व ट्रॅव्हलरचा भीषण अपघात – हितेश एकाचा मृत्यू

सुवर्ण भारत:सुनिल हिंगणकर
विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर / चिमूर :- नेरी मार्गावर दुचाकी व ट्रॅव्हलर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

हितेश कचरुजी गुरुनुले (वय २७) व आशिष मन्सराम श्रीरामे (वय २९) हे दोघेही खुटाळा येथील रहिवासी असून औषधे आणण्यासाठी नेरीकडे जात असताना नेरीकडून भरधाव वेगात येणाऱ्या MH40 AK 7898 क्रमांकाच्या ट्रॅव्हलरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर जखमींना तातडीने चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर
हितेश गुरुनुले याची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारासाठी नागपूरला नेत असताना वाटेत हितेश ची प्राणज्योत मावळली.

दरम्यान, संबंधित ट्रॅव्हलर व दुचाकी वाहन चिमूर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली असून ट्रॅव्हलर चालक अमोल गिरडे (रा. नेरी) यांना पंचनामा व पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले आहे. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.