Home Breaking News #Ballapur • वस्ती विभागातील पाणी प्रश्नावर मंगेश बावणे यांची ठाम भूमिका

#Ballapur • वस्ती विभागातील पाणी प्रश्नावर मंगेश बावणे यांची ठाम भूमिका

88

#Ballapur
• वस्ती विभागातील पाणी प्रश्नावर मंगेश बावणे यांची ठाम भूमिका

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

बल्लारपूर : वस्ती विभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येसाठी सामाजिक बांधिलकी जपत तत्परतेने पुढाकार घेणारे मंगेश बावणे यांनी पुन्हा एकदा जबाबदार नेतृत्वाचे उदाहरण घालून दिले आहे.

नागरिकांनी आपल्या अडचणी मांडताच बावणे यांनी तात्काळ पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता गोपाल खटाके यांची भेट घेत निवेदन सादर केले. सध्या बदलण्यात आलेली पाणीपुरवठ्याची वेळ पूर्ववत करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होत असून, अनियमित वेळेमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्ग यांना पाणी साठवताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

पाण्याची वेळ नियमित व पूर्वीप्रमाणेच ठेवावी, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी स्पष्ट भूमिका बावणे यांनी मांडली. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांच्या समस्या मार्गी लावाव्यात, अशी अपेक्षा वस्ती विभागातील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.