
#Chimur
• शिवजन्मोत्सवानिमित्त चिमूर-नेरीत उत्साहाचे वातावरण : छत्रपतींना अभिवादन
• शिवभक्तांच्या जल्लोषात पूजन-अभिवादन-चिमूर व नेरीत भक्तिभावाचे वातावरण
सुवर्ण भारत:सुनिल हिंगणकर
विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चिमूर : – अखंड भारताचे आराध्य दैवत व स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव चिमूर व नेरी परिसरात उत्साह, भक्तिभाव आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख भास्कर ताजने व उपजिल्हाप्रमुख अमित आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, विधानसभा प्रमुख श्रीहरी सातपुते यांच्या उपस्थितीत दि. ६ मार्च २०२६ रोजी तालुका प्रमुख सुधाकर निवटे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व शिवसैनिकांनी शिवाजी चौक येथे एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मानाचा मुजरा केला. यावेळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर नेरी येथील बाजार चौक व मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आले. आरती, पूजन व पुष्पहार अर्पण करून शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी”, “जय जिजाऊ” अशा घोषणांनी चिमूर व नेरी परिसर दुमदुमून गेला.
या शिवजन्मोत्सव सोहळ्यात तालुका प्रमुख सुधाकर निवटे, विधानसभा प्रमुख श्रीहरी सातपुते, विधानसभा समन्वयक देविदास गिरडे, तालुका समन्वयक बंडू पिसे, तालुका संघटक केवलसिंग जुनी, योगेश ढोणे, किशोर उरकुंडे, राजेंद्र जाधव, सुनील हिंगणकर, गोपीचंद उरकुळे, बाबा निकाळे, पुरुषोत्तम निवटे, योगेश मेश्राम, शार्दुल पचारे आदी उपस्थित होते.





