Home Breaking News जागतिक महिला दिन विशेष आरोग्य सेवेतून समाजसेवेचे मूल्य जोपासतात आरोग्य सेविका...

जागतिक महिला दिन विशेष आरोग्य सेवेतून समाजसेवेचे मूल्य जोपासतात आरोग्य सेविका कांचन चंदनखेडे

101

• जागतिक महिला दिन विशेष

• आरोग्य सेवेतून समाजसेवेचे मूल्य जोपासतात आरोग्य सेविका कांचन चंदनखेडे

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस: प्राथमिक आरोग्य केंद्र वार्ड क्रमांक ४ च्या आरोग्य सेविका कांचन चंदनखेडे यांचे कार्य गौरवास्पद आहे. गरीब अशिक्षित मजूर परप्रांतीय लोकांचं वास्तव असलेल्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या परिसरात त्या प्रामाणिकपणे एक कर्तव्यतत्पर राहून आरोग्य सेवा देतात.

विशेष म्हणजे महिलांच्या आजाराविषयी त्या गांभीर्यपूर्वक सतत जागृत असतात नोकरी करताना समाजातील जबाबदार घटक म्हणून सेवा देण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात याचा भाग म्हणून मागील सत्रात रसिदा शेख नावाच्या गुंतागुंतीचा गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या गरोदर महिलेचे व तिच्या बाळाचे प्राण वाचविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली या सत्रात शिवनगर भागातील सहा गर्भपात झालेल्या सुजाता दामेर नावाच्या गरीब महिलेला जुडी गर्भधारणा झाली अत्यंत कमी वजनाची बाळे जन्माला आली यात त्यांनी आपल्या सहकार्यासमवेत परिश्रम घेऊन बाळांचे वजन वाढविण्यात यश मिळविले म्हातारदेवी येथील दोन गंभीर सिजर झालेल्या महिलांच्या पतीच्या मनातून भीतीचा संभ्रम दूर करून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात यश मिळविले आपल्या शिस्तप्रिय स्वभावाने त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांना वेळेची शिस्त लावली आरोग्य विषयक विकास झपाट्याने वाढ झाली अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी निशुल्क व गुणवत्ता पूर्ण आरोग्य उपचाराद्वारे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना द्वारे वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिये करिता मदत यावर त्यांनी वारंवार भर दिला.

किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयक सल्ला लहान बाळांचे लसीकरण सात रोग याविषयी त्या सतत जागरूक राहून कार्य करतात अलीकडेच घुग्घूस प्राथमिक आरोग्य केंद्राला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला . यात त्यांच्या ग्रामीण भागातील कार्याचे बहुमूल्य योगदान आहे आपल्या प्रामाणिक व तळमळतेने सेवाद्वारे त्या जनसामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य त्यांच्या कार्याला शोभून दिसणार आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला घुग्घूस नगरवासीयांच्या शुभेच्छा