Home Breaking News #Ballarpur • महिला दिनानिमित्त बल्लारपूर सक्षम महिला बचत गटाची मैत्रीपूर्ण भेट

#Ballarpur • महिला दिनानिमित्त बल्लारपूर सक्षम महिला बचत गटाची मैत्रीपूर्ण भेट

194

#Ballarpur

• महिला दिनानिमित्त बल्लारपूर सक्षम महिला बचत गटाची मैत्रीपूर्ण भेट

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : स्थानिक स्तरावर कार्यरत असलेल्या सक्षम महिला बचत गटातील महिलांनी ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “एक मोकळा श्वास” या ठिकाणी मैत्रीपूर्ण भेट घेऊन महिला दिन साजरा केला. या भेटीत महिलांनी एकत्र येत संवाद साधला, अनुभवांची देवाणघेवाण केली आणि महिला सक्षमीकरणाबाबत चर्चा केली.

या कार्यक्रमाला गटाच्या अध्यक्षा सोनाली बागडे तसेच सचिव रागिनी बेझेलवार उपस्थित होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटातील सदस्यांनी एकोप्याने महिला दिन साजरा करत महिलांच्या एकजुटीचा संदेश दिला.

या वेळी गटातील इतर सदस्यही उपस्थित होत्या. त्यामध्ये अनीता गावतुरे, संगीता मोहुरूले, ज्योती चोखांद्रे, पिंकी शाह, आशा,खोब्रागडे मंजुषा रामगीरवार आणि साधा सरदा भगत यांचा समावेश होता.

महिला दिनानिमित्त आयोजित या भेटीत महिलांनी आनंददायी वातावरणात एकत्र येत परस्परांना प्रोत्साहन देण्याचा आणि समाजात महिलांचे स्थान अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला.