#Chandrapur
• महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं काव्यकुंजच्या कवयित्री वैजयंती गहुकर यांना अष्टपैलू काव्यभूषण पुरस्कार बहाल!
चंद्रपूर -विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : समाजसेविका मायाताई कोसरे व जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे यांच्या सहज सुचलं गृपवरील काव्यकुंजच्या एक सदस्य चंद्रपूरच्या रहिवाशी सुपरिचित कवयित्री वैजयंती गहुकर यांना मुंबईच्या अष्टपैलू संस्कृती कला अकादमीच्या वतीने नुकताच अष्टपैलू काव्यभूषण राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
कवयित्री गहुकर यांना काव्यभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल चंद्रपूरच्या समाजसेविका योगशिक्षिका रंज्जू दिलीप मोडक, मूलच्या नगरसेविका नलिनी आडपवार, कोसंबीच्या समाजसेविका चंदा कामडी, कवयित्री विद्या पिंजरकर, ठाण्याच्या कवयित्री कु.मंगल मिसाळ, नाशिकच्या चैताली आतराम, पुण्याच्या महिला पत्रकार स्नेहा मडावी, भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष किरण साळवी, गडचांदूरच्या ऐश्वर्या मांदाडे, चंद्रपूर वास्तुशिल्पकार शिवानी झाडे, मूलच्या पोर्णिमा किर्तीवार, पूनम मडावी, प्रांजू मखरे,अधिवक्ता हिमानी वाकुडकर, चंद्रपूरच्या गायिका रश्मी हिवरे, अधिवक्ता सारिका टेंभरे, नाट्य कलावंत टिना उराडे,सविता कोट्टी,राजूराच्या अंजली गुंडावार, संजीवनी धांडे,सरोज हिवरे , साधना धकाते,नवोदित कवयित्री पूजा पाटील, नागपूरच्या सुपरिचित कवयित्री वैशाली राऊत, मुंबईच्या गझलकार प्रा.नंदा पाटील, रोहिणी पराडकर, सुरतच्या प्रा.राजश्री पाटील, अधिवक्ता प्रेरणा सहारे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.





