Home Breaking News साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंत कवयित्री शैला चिमड्यालवार यांचा एक प्रवास!

साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंत कवयित्री शैला चिमड्यालवार यांचा एक प्रवास!

151

साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंत कवयित्री शैला चिमड्यालवार यांचा एक प्रवास!

सुवर्ण भारत:किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्रभर जे काही व्हाॅट्सअप गृप आहे.त्यात सहज सुचलं हा एक गृप आज आचार विचारांचा एकमेव व्हाॅट्सअप गृप ठरला आहे.
ह्या गृपसाठी सावलीच्या प्रख्यात कवयित्री शैला चिमड्यालवार यांचे योगदान मोलाचे आहे.हे कोणी नाकारू शकत नाही.
सहज सुचलंच्या माध्यमातून आज त्यांचे नाव साहित्य क्षेत्रात महाराष्ट्रात प्रसिद्धीच्या झोतात आहे.
त्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या एका सहमार्गदर्शिका म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असतानाच याच गृपच्या माध्यमातून त्यांनी नित्य संस्कार धारा हे सदर आरंभ केले . आणि बघता बघता शंभर भागाचा पल्ला त्यांनी गाठला!
हे शतक पूर्ण करताना त्यांनी रोज नविन विषयांची मांडणी केली.संक्षिप्त लिखाणातून चिमड्यालवार यांनी अनेक सुज्ञ वाचकांचे लक्ष देखील वेधले.
बरेचदा संस्कार धारावर वाचकांचे अभिप्राय सुद्धा आले.
◼️साहित्यिक क्षेत्रातली त्यांची कामगिरी उल्लेखनीय व कौतुकास्पद अशीच आहे.
नवोदित कवयित्रींसाठी त्या प्रेरणादायी ठरल्या आहेत.
सहज सुचलंने अनेकदा त्यांच्या काव्यरचनेला प्रसिद्धी देखील दिली आहे.
◼️सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मेघा धोटे यांनी नेहमीच त्यांच्या साहित्य लिखाणाचे गोड कौतुक केले आहे.तर काही वेळा त्यांनी मुर्ती छोटी पण किर्ती मोठी असे देखील त्यांना संबोधले आहे.
साहित्याच्या माध्यमातून त्यांचा प्रवास कविसंमेलनापासून तर पुणे एफऐम पर्यंत पोहचला आहे.
◼️विदर्भातील नागपूरात त्यांना एका सामाजिक संस्थेद्वारे त्यांच्या भरीव कामगिरी साठी सन्मान पुरस्कार देखील बहाल झाला आहे.हिच त्यांच्या यशाची खरी पावती आहे असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
घरगुती कामे व व्यवसाय सांभाळून मिळालेल्या रिकाम्या वेळेत त्यांच्या हातात लेखणी असते . त्यातून प्रासंगिक किंवा काल्पनिक लिखाण शब्दांकित करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असते.
◼️एक प्रतिभावंत साहित्यिक म्हणून विदर्भात त्यांची ख्याती आहे.
साहित्याची आवड व गोडी असल्यामुळे नवीन विषयांचे साहित्य लिहण्यासाठी त्यांची सदैव धडपड सुरू असते.त्या कधीच शांत बसत नाही.
एखादे दिवशी काही लिखाण केले नाही तर आज आपण काही तरी विसरले ही खंत सतत त्यांच्या मनाला बोचत असते.
अश्या या प्रतिभावंत कवयित्री शैला चिमड्यालवार आज महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या सहमार्गदर्शिका म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे.