Home Breaking News #Chandrapur • महिला दिन कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान! • कार्यक्रमाला चंद्रपूरच्या...

#Chandrapur • महिला दिन कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान! • कार्यक्रमाला चंद्रपूरच्या सारिका उराडे व कोमल पारोधी यांची उपस्थिती!

105
Oplus_131072

#Chandrapur
• महिला दिन कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

• कार्यक्रमाला चंद्रपूरच्या सारिका उराडे व कोमल पारोधी यांची उपस्थिती!

सुवर्ण भारत: किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : महिला दिनाच्या निमित्ताने दि. 11/3/2026 रोजी मातोश्री लाॅस चांदवड या ठिकाणी अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अखिल भारतीय प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हिरामण मनोहर मनमाड तसेच महीला आघाडी नाशिकच्या जिल्हाध्यक्ष माया निरभवणे उपस्थित होते.या शिवाय
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय लोक कलावंत सांस्कृतिक समितीच्या संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्षा चंद्रपूरच्या सारिका उराडे ,राष्ट्रीय सचिव कोमल पारोधी , नाशिकचे जिल्हाध्यक्ष अंबादास वानखेडे व जिल्हा सचिव समाधान आहिरे प्रामुख्याने उपस्थित होते.