कोसंबी खडसमारा येथील जलशुध्दीकरण केंद्र सुरू
चंद्रपूर : किरण घाटे
ब्रम्हपुरी तालुक्यातील कोसंबी खडसमारा येथे
मागील वर्षी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या माध्यमातून जलशुद्धीकरण संयंत्र (R.O.ATM) सुरू करण्यात आले होते.
त्यामुळे स्थानिक जनतेला पिण्याचे शुद्ध थंड पाणी मिळू लागल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते .परंतु मागील 15 दिवसां पासून सदरील जलशुध्दीकरण संयंत्रात बिघाड झाल्याने तसेच त्या संबंधातील वीज बिल न भरल्याने आरोचे पाणी मिळणे बंद झाले त्यामुळे स्थानिक नागरिकांना 6 ते 7 किलो मीटर अंतरावरील आवळगाव,वांद्रा, भुज येथून पायपिट करून पाणी आणावे लागत होते . आरो मशीन सुरू करण्यासाठी अनेकदा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा विभाग इंजिनिअर व जलशुध्दीकरण संयंत्र बसविणाऱ्या खाजगी कंत्राटदार कडे तक्रार करूनही ते याकडे दुर्लक्ष करीत होते.
दि. 12 मार्च 2026 रोजी कोसंबी खडसमारा येथे आदिवासी समाजाच्या वतीने शहीद स्वातंत्रवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्ताने समाज प्रबोधन कार्यक्रम व त्या अनुषंगाने गाव भोजन ठेवण्यात आले होते.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने थंड आरोचे पाणी आवश्यक असल्याने सरपंच संगीता जेंगटे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे यांच्या कडे तक्रार केली असता झोडगे यांनी तात्काळ कोसंबी खडसमारा येथे भेट देऊन जलशुध्दीकरण संयंत्र केंद्राची पाहणी केली व लगेच कंत्राटदार व इंजिनिअर यांना
भ्रमणध्वनी द्वारे चर्चा केली .तांत्रिक बिघाड असलेला जलशुद्धीकरण संयंत्र सुरू करण्यासाठी आणि थकित वीज बिल भरून पूर्ववत कनेक्शन चालू करण्यासाठी प्रयत्न केल्याने लगेच त्याच दिवशी 1 तासाच्या आत तांत्रिक बिघाड दुरुस्ती करून थकित असलेला 4000 रुपये वीज बिल भरून पूर्ववत जलशुद्धीकरण संयंत्र सुरू केले .
आता आरोचे थंड पाणी मिळत असल्यामुळे गावकऱ्यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.




