Home Breaking News ग्राम पंचायत सदस्य ते संचालिका पर्यंत प्रवास करणाऱ्या चंदा कामडी !

ग्राम पंचायत सदस्य ते संचालिका पर्यंत प्रवास करणाऱ्या चंदा कामडी !

53
Oplus_131072

ग्राम पंचायत सदस्य ते संचालिका पर्यंत प्रवास करणाऱ्या चंदा कामडी !
—–
◼️✍️◼️शब्दांकन- किरण घाटे

ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या चंदा कामडी ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या एक जेष्ठ सदस्या आहेत.

मुल नगरीतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.घरातील राजकीय वारसा लाभलेल्या चंदा कामडी यांना महाविद्यालयीन जीवनापासून समाजसेवेची आवड होती!
त्यातूनच त्यांनी समाजसेवेच्या कार्याला प्रारंभ केला.

अल्पकालावधी त्यांनी कोसंबी या गावातील गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला.राजकीय कारकिर्दीची नंतर सुरूवात झाली.
हे सर्व करीत असताना त्यांनी स्वतःच्या घराकडे मुळीच दुर्लक्ष केले नाही.
आपल्या मुलांना संस्काराचे धडे दिले .इतकेच नाही तर त्यांनी मुलांना शिक्षणासाठी नेहमीच मार्गदर्शन करीत प्रोत्साहन दिले.
कुटूंबाचा सांभाळ करीत असताना राजकीय क्षेत्रात प्रवेश केला व तब्बल १५ वर्ष कोसंबी ग्राम पंचायतीच्या सदस्य राहण्याचा मान त्यांनी मिळविला.
एवढे वर्षं ग्राम पंचायतच्या सदस्य असतांना चंदा कामडी यांनी गाव विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले आहे.काही अंशी त्या यात यशस्वी देखील झाल्या!
गावचा सर्वांगीण विकास हेच त्यांचे मुख्य स्वप्न आहे.आजही त्यांची धडपड थांबलेली नाही.या साठी त्यांचा प्रयत्न सतत सुरू असतोच!

मुल नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका नलिनी दिनेश आडपवार यांच्या त्या फार जिवलग मैत्रिणी असून गावाशेजारील नांदगावच्या ॲड.हिमानी वाकुडकर यांच्याशी समाजसेविका चंदा कामडी यांचे अतिशय निकटचे संबंध आहे.

जनहितचे चंद्रपूर गडचिरोली जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ व अर्चना समर्थ यांनी मुल नगरीत आयोजित केलेल्या महिला कर्तृत्ववान सन्मान पुरस्कार समारंभात चंदा कामडी यांची विशेष अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थिती होती.याच गौरव पुरस्कार सोहळ्यात मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांच्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या तब्बल तेरा कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बाबत सन्मान पुरस्कार बहाल करून सन्मानित करण्यात आले होते.
त्या भव्य समारंभात नलिनी आडपवार यांची उपस्थिती होती तर सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांना मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
चंदा कामडी यांचे कार्य आजच्या घडीला नवोदित तरुणींना प्रेरणादायी ठरणारे आहे.असे म्हटल्यास कदापीही ते अतिशयोक्तीच ठरणार नाही.

सर्वांचा विश्वास जपणा-या समाजसेविका चंदा कामडी यांचा आज वाढदिवस मुल नगरीत त्यांच्या निवासस्थानी संध्याकाळी थाटात साजरा होत आहे.
त्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!