Home Breaking News लेखी आश्वासनानंतर बंडू धोतरेंच्या अन्नत्याग आंदोलनाची सांगता!

लेखी आश्वासनानंतर बंडू धोतरेंच्या अन्नत्याग आंदोलनाची सांगता!

53
Oplus_131072
Oplus_131072

लेखी आश्वासनानंतर बंडू धोतरेंच्या अन्नत्याग आंदोलनाची सांगता!

चंद्रपूर :  किरण घाटे 
विशेष प्रतिनिधी

गेल्या दहा दिवसांपासून येथील स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंडू धोतरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
आज चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अशोक उईके यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन सोडविण्यात आले .
धोतरे यांनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दिला होता.
लोहखाण प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी नाकारल्याचे लेखी आश्वासन मिळाले त्यानंतर त्यांनी हे आंदोलन संपविले.आंदोलन मंडपात या वेळी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक रामानूजन , मुख्य कार्यकारी पुलकितसिंह उपस्थित होते.