Home Breaking News “चला माझ्या ताडोबाला” निसर्ग शिक्षणातून वन संवर्धन !

“चला माझ्या ताडोबाला” निसर्ग शिक्षणातून वन संवर्धन !

56
Oplus_131072

“चला माझ्या ताडोबाला”
निसर्ग शिक्षणातून वन संवर्धन !

सुवर्ण भारत:किरण घाटे( विदर्भ विशेष प्रतिनिधी) 

चंद्रपूर :  दि.२०मार्च चला माझ्या ताडोबाला या उपक्रमांतर्गत निसर्ग शिक्षणातून संवर्धन ! या उद्देशाने चंदनखेडा येथील पीएमसी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच ताडोबा सफारी केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे ताडोबा !
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सफारी करताना विद्यार्थ्यांना विविध वन्यजीव वनस्पती व जंगल संवर्धन याबाबतची माहिती जाणून घेतली .
विविध प्रकारचे हरीण, सांबर, चितळ ,निलगाय ,मोर ,वाघ इत्यादी विविध प्रकारचे पशुपक्षी बघितले .
ताडोबा सफारीसाठी शासनाच्या वतीने गाडी देण्यात आली.मोफत शासकीय वाहनाने विद्यार्थी शिक्षक यांनी ताडोबा सफारी केली. ताडोबा सफारीसाठी वाहक संदीप पाटील व राकेश कराडे यांनी विशेष सहकार्य केले .
या सफारीसाठी शिक्षणाधिकारी राजेश्वरी दयालवार यांनी ताडोबा येथील प्राण्यांविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली .
ताडोबा सफारीत 40 विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापिका अनिता आईंचवार सहाय्यक शिक्षिका कविता हनवते व सहाय्यक शिक्षक दिनेश उईके यांचा सहभाग होता.