Home Breaking News • घुग्घूसमध्ये इंडेन गॅससाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा; भर उन्हात प्रतीक्षेमुळे हालअपेष्टा ...

• घुग्घूसमध्ये इंडेन गॅससाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा; भर उन्हात प्रतीक्षेमुळे हालअपेष्टा • तातळीने गॅस उपलब्ध करून घ्या: राजु रेड्डी

58

• घुग्घूसमध्ये इंडेन गॅससाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा; भर उन्हात प्रतीक्षेमुळे हालअपेष्टा

• तातळीने गॅस उपलब्ध करून घ्या: राजु रेड्डी

सुवर्ण भारत:पंकज रामटेके (सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर)

घुग्घूस : शहरातील देवनील इंडेन गॅस एजन्सी येथे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, सकाळपासूनच ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. भर उन्हात तासनतास उभे राहून सिलेंडरची प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून गॅसची कोणतीही टंचाई नसल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात घुग्घूसमध्ये परिस्थिती चिंताजनक दिसून येत आहे. गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या रांगेत उभे राहावे लागत असून, महिलांसाठी स्वतंत्र रांगेची सोय नसल्याने महिला व पुरुष एकाच रांगेत उभे राहत आहेत.

याशिवाय, एजन्सी परिसरात बसण्याची व पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. उन्हाच्या कडाक्यात लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना विशेषतः अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के व उपनगराध्यक्ष राजुरेड्डी यांनी संबंधित गॅस एजन्सीला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत एजन्सी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली व गॅस पुरवठ्यातील अडचणींबाबत माहिती घेतली.

Oplus_131072

राजुरेड्डी यांनी तातडीने गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी करत नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व बसण्याची व्यवस्था करावी, तसेच महिलांसाठी स्वतंत्र रांग सुरू करावी, अशा सूचना दिल्या. तसेच, जिल्हाधिकारी स्तरावर चर्चा करून गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“नागरिकांनी संयम बाळगावा, सर्वांना गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येईल. घाबरून जाण्याचे कारण नाही,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या वेळी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, प्रशांत सारोकर, रोहित डाकूर, कुमार रुद्रारप, आयुष आवळे, साहिल आवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.