Home Breaking News घुग्घूसमध्ये नगराध्यक्षा व मान्यवरांचा उत्साहात सत्कार; विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन

घुग्घूसमध्ये नगराध्यक्षा व मान्यवरांचा उत्साहात सत्कार; विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन

61

घुग्घूसमध्ये नगराध्यक्षा व मान्यवरांचा उत्साहात सत्कार; विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन

सुवर्ण भारत:पंकज रामटेके( सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर)

घुग्घूस : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली संचालित प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घूस (ता. जि. चंद्रपूर) येथे घुग्घूस नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार समारंभ पार पडला. यामध्ये नगराध्यक्षा सौ. दिप्ती सोनटक्के, उपनगराध्यक्ष राजू रेड्डी, बांधकाम सभापती रोशन पचारे तसेच स्वीकृत सदस्य तौफीक शेख, रोहित डाकूर, सैय्यद अनवर व रोशन दंतलवार यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या अनू चोथे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वैशाली जोशी व सुनील म्हैस्के यांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत कठोर परिश्रम, शिस्त आणि ध्येयवादी वृत्ती अंगीकारण्याचे आवाहन केले. नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के यांनी विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने पुढे जात समाजात आदर्श निर्माण करावा, असे सांगितले. तर राजू रेड्डी व रोशन पचारे यांनीही करिअर घडवताना योग्य दिशा निवडण्याचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलवंत विखार यांनी प्रभावीपणे केले. आभार प्रदर्शन संजय माहुरे यांनी मानले. या कार्यक्रमास शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. समारंभामुळे विद्यालयात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.